सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : नागरिकांना एक चांगली सुविधा द्यावं, केवळ राजकारण करत असताना केवळ विकास, भौगोलिकता, रस्ते, वीज, पाणी होते. परंतु माझ्या विधानसभेत माझ्या माता बहीनींचं आरोग्य उत्तम राहावं. व आनंद मिळावा, असे प्रतिपादन आ. संजीव रेड्डी बोदकूरवार यांनी केले. लॉयन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल,वणी येथील भाजप शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.शेवटी हेच विचारलं जातं की, तुमची तब्बेत कशी आहे; मुलंबाळ किती आहे असेही ते म्हणाले.
दि. 22 सप्टेंबर रोजी वणी येथे आयोजित सेवा पंढरवाडा कार्यक्रमाअंतर्गत भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल नांदेपेरा रोड येथील शाळेत निशुल्क भव्य आरोग्य शिबीर, सर्व रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सर्व रोगनिदान व उपचार सावंगी (मेघे) येथील तज्ञ डॉ. एल पी शिंगणे व डॉ. अभिषेक इंगोले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. या शिबिरात झरी, मारेगाव, वणी तालुक्यातील जवळपास चार हजार गरजू रुग्ण सहभागी झाले.
शिबिराचे उद्घाटन वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते दीपप्रज्वललन करून करण्यात आले. यावेळी मंचावर ललितारेड्डी बोदकुरवार, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, रवि बेलूरकर, श्रीकांत पोटदुखे, गजानन विधाते, संध्या अवतारे, मंगला पावडे, लिशा विधाते, उमा पिदूरकर, उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार श्री. बोदकुरवार म्हणाले, तुमच्याकडे संपत्ती किती आहे, पैसे किती आहे हे कोणी विचारत नाही. म्हणून आरोग्य जपा,आरोग्य हिच सर्वात मोठी संपत्ती आहे. हे आपण सर्वांनी जपून राहावं, म्हणून मी या विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून भाजप व विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) च्या वतीने निशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन केले. एक चांगली सुविधा नागरिकांना या शिबिरातून मिळतेय, मी मनापासून या आरोग्य शिबिरात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानतो. यापुढेही सेवाभावी उपक्रम सुरू राहणार आहे.
वणी विधानसभा क्षेत्रातील 3600 जणांनी या शिबिराचा लाभ घेतला, तर डॉक्टरांनी 300 रुग्णांना शस्त्रक्रियाचा सल्ला देण्यात आला. त्यांना सावंगी (मेघे) येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे. शिबिरात रक्तदाब, किडनीचे आजार, हृदयरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, त्वचारोग, श्वसनरोग, नाक कान घसा इत्यादी रुग्णांची तपासणी तज्ञाकडून करण्यात आली. सर्व रुग्णांना निशुल्क औषधी वाटप केली.
कार्यक्रमाचे संचालन नितीन वासेकर यांनी केले तर, मान्यवरांचे आभार जयमाला दर्वे यांनी मानले. वणी विधानसभा प्रमुख संजय पिंपळशेंडे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून या निशुल्क भव्य आरोग्य शिबीराची संक्षिप्त रूपरेषा मांडली. दरम्यान, सर्व रुग्णांसाठी आयोजकांतर्फे भोजन व्यवस्था करण्यात आली होती.
या शिबिराला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर थेरे, डॉ. धर्मेंद्र सुलभेवार, डॉ. प्रेमानंद आवारी, केमिस्ट ऍन्ड ड्रगिस्ट असोसिएशन वणी, आशा वर्कर, गट प्रवर्तिका, ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच, ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, लॉयन्स इंग्लिश मिडियम हायस्कूल येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांची टीम तसेच भारतीय जनता पार्टीचे वणी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक मेहनत घेतली.
आरोग्य जपा,आरोग्य हिच सर्वात मोठी संपत्ती आहे -आ. संजीवरेड्डी बोदकुरवार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 23, 2024
Rating: