सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : लोढा हॉस्पिटल मारेगाव येथे भव्य मोफत महाशिबिराचे आयोजन शनिवार दिनांक 21 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी ठीक 1 ते 5 वाजता येथील हॉस्पिटलच्या प्रांगणात आयोजित केले आहे. तरी मारेगाव तालुक्यातील सर्व सन्माननीय लाभार्थ्यांनी या मोफत महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सध्याच्या महागाई च्या स्थितीत महागडा उपचार घेणे अवघड झाले असून आरोग्याच्या समस्या दिवसागणिक वाढत आहे. वणी उपविभागात सामाजिक दातृत्वाचे धनी असलेले काँग्रेस पक्षाचे डॉ. महेंद्र लोढा यांच्या सुबक कल्पनेतून आरोग्य सुदृढीसाठी विशेष करून मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात मोफत आरोग्य तपासणी, रोग निदान, इसीजी, रक्त तपासणी, बी एम डी तपासणी,व प्राथमिक औषधी वितरण असे आयोजन केलेले आहे.
मारेगाव शहरातील सर्व नागरिकांना, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व आजी व माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊन वरील सर्व तपासण्या व महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. महेंद्र लोढा यांनी केले आहे.
21 सप्टेंबर रोजी लोढा हॉस्पिटलात भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 19, 2024
Rating: