सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : शहरात दि.16/9/2024 रोजी रक्तदान शिबिर ईद-ए-मिलादून्नबी म्हणजेच प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त "जमात ए इस्लामी हिंद" यांच्या वतीने शिबिर घेण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जमात-ए-इस्लामी हिंदचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष आरिफ खान होते. तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश किन्द्रे, पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी तसेच वाहतूक विभाग शाखा पुलिस निरीक्षक सीता वाघमारे ह्या उपस्थित होत्या.
यावेळी शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या रक्तदान शिबिरामध्ये 196 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात विशेषतः 35 महिलांनी देखील सहभाग घेतला होता. यावेळेस पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश किन्द्रे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले, त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळेस विविध राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराला भेट दिली. जातिभेद व धर्मभेद विसरून एकतेचे दर्शन यावेळी घडले. सर्व एकत्र येऊन असे सामाजिक उपक्रम राबविण्यात येवून या कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन आरिफ सर यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ. सय्यद अतीक यांनी केले. आभार प्रदर्शन ज़िया अहमद यांनी केले.
तसेच या शिबिराला यशस्विरित्या पार पाडण्यासाठी हाफिज सलीम अंसारी, मुश्ताक भाई, सालिस शेख, निसार मिस्त्री, शकील शेख, ज़मीर शेख, सलीम शेख, सादिक शेख, नाहिद अंसारी, आरिफ सर, अब्दुल कय्यूम, सय्यद यूनुस, चेतन नगराळे यासह अनेकांनी अथक परिश्रम घेतले.
प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 18, 2024
Rating: