अशोक मेश्राम यांनी कोवे कुटुंबियांचे भेट घेऊन केले सांत्वन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राळेगाव : पिंपरी दुर्ग येथील आरती शरद कोवे या आदिवासी महिलेला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार करून निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती, त्या पिडीत कोवे कुटुंबाच्या घरी जाऊन मा. वरीष्ठ पोलिस अधिकारी अशोक मेश्राम यांनी भेट घेऊन सांत्वन केले. 

भेटी दरम्यान, त्यांनी दुःखद भावना व्यक्त करित म्हणाले की, माझ्या आदिवासी समाजावर होणारे अन्याय, अत्याचार खपवुन घेतले जाणार नाही. मी या घटनेचा निषेध करतो, मी माझ्या आदिवासी समाजासोबत आहे. माझ्या आदिवासी समाजातील महिला, पुरुष युवक, युवती, यांनी समाजातील अशा कु-प्रवृत्तीपासून दूर राहून फक्त आणि फक्त शिक्षणाची कास धरली पाहिजे. मृतक आरती कोवे, या महिलेच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी लढा उभारावा लागणार आहे, त्यासाठी सर्वांनी एकजूट व्हावे, दरम्यान अशोक मेश्राम यांनी शोक व्यक्त केला. 

यावेळी अशोक मेश्राम व त्यांचा मित्र परिवार व सोबत समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
अशोक मेश्राम यांनी कोवे कुटुंबियांचे भेट घेऊन केले सांत्वन अशोक मेश्राम यांनी कोवे कुटुंबियांचे भेट घेऊन केले सांत्वन Reviewed by सह्याद्री चौफेर on August 19, 2024 Rating: 5
Powered by Blogger.