वाघाच्या हल्ल्यात गाय जखमी;वनविभागाने बंदोबस्त लावण्याची मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राळेगाव : तालुक्यातील अंतरगाव,जागजई परिसरात वाघाचा वावर असल्याने येथील नागरिक दहशतीत आले आहे. दिनांक 18 ऑगस्ट 2024 च्या रात्री अंतरगाव येथील निकेश महादेव नेहारे यांच्या मालकीची गाय व बैल हे घरा जवळ बांधुन असतांना वाघाने गायीवर हल्ला करून गंभीर जखमी केले. 

त्यामुळे शेतकऱ्याचे 50 हजाराचे नुकसान झाले असल्याचे बोलल्या जात असून वाघाच्या धास्तीने परिसर दहशतीत तर आलाच. मात्र, वाघाच्या अचानक हल्ल्याने बांधून असलेले बैल पळुन गेले. त्यामुळे संबंधित विभागाने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी नागरिकांतून मागणी होत व तातडीने वाघाचा बंदोबस्त लावला, अशी अंतरावर, जागजई परिसरातील नागरिकांचे वनविभागाकडे मागणी जोर धरत आहे.
वाघाच्या हल्ल्यात गाय जखमी;वनविभागाने बंदोबस्त लावण्याची मागणी वाघाच्या हल्ल्यात गाय जखमी;वनविभागाने बंदोबस्त लावण्याची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on August 19, 2024 Rating: 5
Powered by Blogger.