सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. शनिवारी दि. २२ ते वणी येथे येणार असून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विधानसभा निवडणुकीत 'एकला चलोरे'ची भूमीका त्यांनी घेतली आहे.
महाराष्ट्रात २५० जागा लढण्याचे संकेत दिले आहेत. विदर्भात वणी हा मनसेचा गड समजला जातो, मनसे नेते राजू उंबरकर यांची वणी विधानसभेवर पकड आहे. २० ते २६ ऑगस्टला राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर येत असून २२ ऑगस्टला वणीत येणार आहेत. दि. २३ ऑगस्टला पदाधिकारी यांना मार्गदर्शन करणार आहेत, यावेळी राजू उंबरकर यांच्या उमेदवारीची घोषणा करण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे वणीत येणार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 19, 2024
Rating: