सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : वणी येथील राष्ट्रवादी पक्षाचे माजी शहराध्यक्ष मनोज वकटी यांनी शिवसेना विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता.6) शिवबंधन बांधून शेकडो कार्यकर्तासह शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी सागर गोलाईत, शेख साबीर शेख अब्बास, हेमंत गावंडे, सोनू तिराणकर, बालाजी लांडगे, विशाल सरोदे, सुरज पदलामवार, आशुतोष नागभीडकर, कुंदन पेंदोर, प्रतिक गौरकार, संग्राम गेडाम, आकाश तामिलवार, सुरज खैरे, पराग येसनसुरे, अभिषेक तामिलवार, अश्विन कटोते, संदेश तिखट, पंकज मसराम, तृणाल मोडक यांच्यासह शेकडो तरुणांनी शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश केला आहे.
मागील कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ राहणारे राष्ट्रवादी पक्षाचे मनोज वकटी यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादी पक्षाला खिंडार पडल्याचे बोलले जात आहे. युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात प्रवेश करण्यात आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा सप्ताहानिमित्त शिवसेना जनसंपर्क कार्यालयात सर्व शिवसैनिक उपस्थितीत होते.
नंदेश्वर मंदिरात महाआरती करून गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक हे अभियान वणी विधानसभा क्षेत्रात राबविण्याचे नियोजन वणी शिवसेना नेते संजय देरकर यांनी सुरू केले आहे. यावेळी शेकडो तरुणांनी श्री.देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाला नवसंजिवनी मिळाली आहे.