यवतमाळ जिल्हाधिकारी यांची FPO कार्यालयाला भेट

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी मा. जिल्हाधिकारी महोदय यवतमाळ हे मारेगांव तालुक्यात दौऱ्यावर येऊन सर्व कार्यालय प्रमुखांच्या कामाचा आढावा तहसील कार्यालय मारेगांव येथे घेतला आहे. 

 आढावा बैठक संपन्न झाल्यानंतर मा. जिल्हाधिकारी साहेब यांची सोयागोल्ड शेतकरी उत्पादक कंपनी मारेगाव (FPO Maregaon) येथे भेट देऊन तेथील चालू असलेल्या कार्याची, कामाची पहाणी केली. पहाणी केल्या नंतर कंपनी मार्फत नोंदणीकृत असलेल्या सभासद/सदस्यांना दिल्या जाणाऱ्या शेती विषयक सेवा/सुविधा बाबत चर्चा केली. त्या वेळी कंपनीचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

संचालिका श्रीमती डिमनताई टोगे यांनी निवेदन देऊन अशी विनंती केली की, कंपनी साठी मोठे गोडाऊन हवे आहे परंतु कंपनीची जागा नाही म्हणून अडचण निर्माण होत आहे. त्यावेळी मा. जिल्हाधिकारी महोदय यवतमाळ यांनी औद्योगिक वसाहत मारेगांव येथे जागा/जमीन आहे काय अशी उपविभागीय अधिकारी वणी, तहसीलदार मारेगांव यांना विचारपूस करुन असल्यास त्यांना जागा उपलब्ध करून देण्या संबंधाने सर्व संबंधितांना सुचना केल्या आहेत. कंपनी मार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवा, सुविधा बाबतचे कौतुक करुन भविष्यात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा प्रकारे देता येतील या करीता प्रयत्न करावेत व कंपनी कशी नफ्यात राहिल अशा दृष्टीने वाटचाल चालू ठेवावी अशा सुचना केल्या. 

शेवटी कंपनीचे संचालीका सौ. डिमनताई टोंगे व ईतर यांनी मा.जिल्हाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर दुसऱ्या संचालक श्री सुमंत ठाकरे यांनी सहायक जिल्हाधिकारी कु. लघिमा तिवारी मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले सदर कार्यक्रमाचे ठिकाणी उपविभागीय अधिकारी वणी, तहसीलदार मारेगांव, गटविकास अधिकारी मारेगांव आणि तालुका कृषी अधिकारी मारेगांव व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.

Post a Comment

Previous Post Next Post