सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे
राळेगाव : अशोक मेश्राम माजी वरीष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राळेगाव येथे सकाळी 10. वाजता मा.श्री. बाबासाहेब दरणे जेष्ठ शेतकरी संघर्ष योद्धा, यांच्या हस्ते करण्यात आले.
आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिन हा उत्सव देशभरात साजरा होत असताना राळेगाव येथे या दिनाचे औचित्य साधून शहरातील आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या क्रांतीसुर्य बिरसा मुंडा व शहरातील महामानवांच्या पुतळे,प्रतिमेला माल्यार्पण करून श्री. मेश्राम (मा.व.पो.नि.) यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.एम.के.कोडापे आदिवासी नेते, मा.सुधीर पाटील जवादे अध्यक्ष बेंबळा कालवे शेतकरी संघर्ष समिती यवतमाळ, मा.श्री.बाबा कबीरदास नगराळे सेवानिवृत्त मुख्याध्यापक राळेगाव, मा. सय्यद रहमान अली मेहमूद अली, व सामाजिक कार्यकर्ते राळेगाव, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.