सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मारेगाव, झरी नंतर वणी तालुक्यात आशिष खुलसंगे अध्यक्ष वसंत जिनिंग अध्यक्ष झरी तालुका काँग्रेस कमिटी च्या संकल्पनेतून शेतकरी न्याय यात्रेला काल पासून सुरुवात झाली. तत्पूर्वी 9 ऑगस्ट, क्रांती दिन जागतिक आदिवासी दिन या दिनाच्या पर्वा वर ही न्याय यात्रा मारेगाव तालुक्यातील वनोजा देवी येथील जनामाय कासामाय मंदिर येथून सूरू करण्यात आली होती.
वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, युवकांच्या समस्या संयोजक आशिष खुलसंगे यांनी जाणून घेतल्या मारेगाव व झरी तालुक्यातील शेतकरी न्याय यात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला. 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी 16 ऑगस्ट ला भक्तांचे आराध्य दैवत श्री. जगन्नाथ बाबा देवस्थान, भांदेवाडा येथून शेतकरी न्यायात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी संत जगन्नाथ महाराज्यांच्या पावन भूमीवर नतमस्तक होऊन चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर, काँग्रेस चे जेष्ठ नेते तथा माजी आमदार वामनराव कासावार यांच्या उपस्थितीत यात्रेचे संयोजक आशिष खुलसंगे यांनी या न्याय यात्रेला हिरवी झेंडी दाखवली. त्यानंतर यात्रा पुढे मार्गस्थ झाली. दरम्यान,भर पावसात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उस्फूर्तपणे यात्रेत सहभागी झाले होते. ही न्याय यात्रा भांडेवाडा राजुर, पळसोनी, मुर्धोनी, मोहुर्ली, विरकुंड, बोर्डा, घोंसा (दहेगाव) येथे शेतकरी न्यायात्रेचे स्वागत करण्यात आले.
या यात्रेत मोठ्या संख्येने महिला पुरुष या सह नागरिक स्वयं्फूर्तीने सहभागी झाले होते. तसेच यात्रेचे सहकारी अॅड. देविदास काळे, तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे, महिला जिल्हाध्यक्ष संध्या बोबडे, संजय खाडे, राजू कासावार, राजू ऐलटीवार, जय आबड, महिला शहराध्यक्ष श्यामा तोटावर, यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शेतकरी न्याय यात्रेला तीर्थक्षेत्र भांदेवाडा येथून सुरुवात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 17, 2024
Rating: