टॉप बातम्या

आज भगवान शिव कावड यात्रेला झाली सुरुवात...

सह्याद्री चौफेर | वृरसंस्था 

वणी : आज 17 ऑगस्ट रोजी स्थानिक जैताई माता मंदिर  येथून भव्य कावड यात्रेला सुरुवात झालेली आहे. ती नियोजित मार्गाने शिरपूर महादेव शिखर मंदिर येथे पोहचणार आहे. या यात्रेला प्रारंभ झाला असून हजारो शिवभक्त यात सहभागी झाले. 
      
विशेष म्हणजे कलावंत, डीजे, भजन कीर्तन आणि वाद्यांच्या साथीने भगवान शिव तांडवाचे रूप धारण केले असून, कावड यात्रा वणीच्या जैताई माता मंदिर, टिळक चौक, खाती चौक, गांधी चौक, काठेड ऑइल मिल, श्री रंगनाथ स्वामी चौक, ते शिरपूर गड, या मार्गांवरून मोठ्या थाटामाटात शिव जय घोषणाने शिरपूर येथे पोहोचेल. यात्रे दरम्यान, ठिकठिकाणी निशुल्क चहा अल्पपोहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

यावेळी तारेंद्र बोर्डे, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, राजू उंबरकर, विजय चोरडिया, राकेश खुराणा, संजय खाडे, अनिल पाटील, निकेत गुप्ता,विजय चोरडिया, परमजीत सिंग रंधवा, मुकेश साहुजी, राजा भैया जैस्वाल, आशिष खुलसंगे, योगेश अग्रवाल, यासह इतरही मान्यवर तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने यात्रेत सहभाग घेतला आहे.
Previous Post Next Post