सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : सेवा नगर येथे १५ ऑगष्ट स्वातंत्र्य दिनाच्या ७८ वा स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला हारार्पण व अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.उत्तमराव गेडाम हे होते. तर प्रामुख पाहूणे श्री. वसंतराव चांदेकर सर, श्री. भाऊरावजी आत्राम, डॉ. मडावी साहेब, श्री. रमेश मडावी, श्री. रामदास गेडाम, श्री. भारत मेश्राम हे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तमराव गेडाम यांनी ७८ वा क्रांतीदिनाच्या शुभेच्छा दिल्या व क्रांतीदिनावर मार्गदर्शन केले.
समितीचे अध्यक्ष सुभाष चांदेकर, उपाध्यक्ष विलास परचाके,
सचिव नागो गेडाम, सहसचिव जयवंत कनाके तसेच बाळकृष्ण किनाके, विलास परचाके, परसराम सोयाम, सुमित सोयाम, त्र्यंबक आत्राम, सुरज गटबोरीकर, नत्थूजी टापरे, संदीप सोयाम यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले. सुत्रसंचालन शंकरराव किनाके तर आभार प्रदर्शन जयवंत कनाके यांनी मानले.
क्रांतीवीर बिरसामुंडा समितीच्या वतीने "स्वातंत्र्य दिवस" साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 17, 2024
Rating: