जिल्हा युवा पुरस्काराने स्माईल फाउंडेशन सन्मानित

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणीतील विविध सामाजिक व पर्यावरण विषयक उपक्रम राबवणा-या स्माईल फाउंडेशनला 15 ऑगस्टला यवतमाळ येथे जिल्हा युवा पुरस्कार (2020-21) देऊन सन्मानित करण्यात आले. 50 हजार रोख, सन्मानचिन्ह व गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे झालेल्या सोहळ्यात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव यांच्या आईं पुष्पा जाधव व स्माईल फाउंडेशनच्या चमूनी हा पुरस्कार स्वीकारला. 

जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दरवर्षी जिल्ह्यातील एक युवक, एक युवती व एका संस्थेला युवा पुरस्कार दिला जातो. सागर जाधव यांच्या स्माईल फाउंडेशन या संस्थेला 2021-22 या काळातील विविध समाज हिताोपयोगी उपक्रम, युवकांच्या विकासासाठी कार्य यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. कोरोना काळात स्माईल फाउंडेशनने विविध मदतकार्य केले होते. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना शिधा वाटप, अन्न वाटप केले होते. यासह संपूर्ण वर्ष भर संस्थेद्वारे विविध शैक्षणिक व पर्यावरणविषयक उपक्रम राबवण्यात आले होते. 

त्यांच्या या कार्याची क्रीडा व युवक कल्याण संचलनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांनी दखल घेत स्माईल फाउंडेशनचा स्वातंत्र्य दिनी सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यलयात झालेल्या सोहळ्यात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते तसेच जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड व जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी स्माईल फाउंडेशनच्या पुष्पा जाधव, अर्चना पिदुरकर, रोहित ओझा, गौरव कोरडे, श्री हिंगे यांची उपस्थिती होती. 

अध्यक्ष सागर जाधव, उपाध्यक्ष पीयुष आत्राम सचिव आदर्श दाढे, विश्‍वास सुंदरानी, उत्कर्ष धांडे, खुशाल मांढरे, कुणाल आत्राम, सचिन जाधव, तन्मय कापसे , अनिकेत वासरीकर,जगदीश गिरी, मयूर भरटकर, राज भरटकर, कार्तिक पिदुरकर, विष्णू घोगरे हे सदस्य कार्यरत आहेत.

प्रामाणिक कामाची पावती - सागर जाधव
हा पुरस्कार म्हणजे स्माईल फाउंडेशनने प्रामाणिकपणे केलेल्या विविध कामांची पावती आहे. संस्थेचे्या विविध उपक्रमांसाठी अनेकांनी वेळोवेळी मदत केली. अनेकांनी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेत संस्थेच्या कार्यात हातभार लावला. त्यामुळे हा पुरस्कार संस्थेच्या कायम पाठिशी राहणा-यांना, संस्थेची चमू आणि सर्वसामान्यांना समर्पित करतो. या पुरस्कार संस्थेला प्रोत्साहन देणारा असून भविष्यात आणखी लोकहितोपयोगी उपक्रम राबवले जाईल. 
- सागर जाधव
अध्यक्ष स्माईल फाउंडेशन
जिल्हा युवा पुरस्काराने स्माईल फाउंडेशन सन्मानित जिल्हा युवा पुरस्काराने स्माईल फाउंडेशन सन्मानित Reviewed by सह्याद्री चौफेर on August 16, 2024 Rating: 5
Powered by Blogger.