खळबळजनक...30 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृतदेह निर्जनस्थळी, घातपाताची शक्यता?

सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे
  
राळेगाव : राळेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या कोदुर्ली रोड वर असलेल्या नगर पंचायतीच्या कचरा डपींगच्या परीसरात एका तरुण महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना आज (ता.17) ला दुपारी साडे तीन वाजता च्या सुमारास उघडकीस आली.

सारीका शरद कोवे (30) रा.पिंप्री दुर्ग असे महिलेचे नाव आहे. ती 16/8/24 रोजी राळेगाव येथे बाजारात जाते म्हणून घरुन गेली होती. मात्र, ती महिला घरी न पोहचता एका निर्जन स्थळी संशयास्पद अवस्थेत दुसऱ्या दिवशी म्हणजे आज शनिवारी ला दुपारी 3.30 वाजता चा दरम्यान नको त्या अवस्थेत आढळून आली. विशेष म्हणजे घटनास्थळी महिलेच्या अंगावरचे कपडे अस्त व्यस्त असून दरम्यान, घातपात किंबहुना तीच्या वर अत्याचार करून तीची हत्या केल्याचा कयास व्यक्त केला जात असून राळेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार सिताराम मेहत्रे हे घटनेची माहिती मिळतात तातडीने आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले. व घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आला. 

या प्रकरणी पोलीस तपासातून घटनेचे मुख्य रहस्य समोर येणार आहेतच. मात्र, या घटनेने महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून आरोपीना पकडण्याचे तगडे आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. 


खळबळजनक...30 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृतदेह निर्जनस्थळी, घातपाताची शक्यता? खळबळजनक...30 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृतदेह निर्जनस्थळी, घातपाताची शक्यता? Reviewed by सह्याद्री चौफेर on August 17, 2024 Rating: 5
Powered by Blogger.