टॉप बातम्या

कही ख़ुशी, कही गम...उर्वरित बहिणीला एकदम मिळणार 4500 रुपये

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

पुण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या बहिणींचे फॉर्म रखडले त्यांना तीन महिन्यांचे 4500 रुपये एकदम देणार असल्याची घोषणा केली आहे. 

प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही. 
आता एक कोटी तीन लाख महिलांना त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये प्रत्येकी जमा झाले आहेत. आता थोड्या महिला बाकी आहेत. पण काळजी करू नका, प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही हा आमचा निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

4500 हजार एकरकमी टाकणार
31 जुलैपर्यंतचे फॉर्म भरलेल्यांचे पैसे जमा केले आहेत. 31 ऑगस्टपर्यंतच्या फॉर्मचे पैसे जमा होताना महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्रित पैसे आम्ही टाकणार आहोत. सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही सगळे पैसे मिळणार आहेत. योजना कुठेही बंद होणार नाही. ही खटाखट खटाखट सारखी योजना नाही. ही फटाफट फटाफट चालणारी योजना आहे. आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैसे जात आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मात्र, सर्व बहिणीला रक्षाबंधन ला भावाकडून मिळणारी भेट... कही ख़ुशी, कही गम अशी तूर्तास झाली आहे.
Previous Post Next Post