सह्याद्री चौफेर | राजू डावे
वणी : आज दि.29 नोव्हेंबर रोजी स्थानिक टिळक भवन यवतमाळ येथे यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली असता त्यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष विजय नगराळे, यांच्या उपस्थितीत वणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी खुशाल बासमवार यांची नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त तालुका कार्याध्यक्ष खुशाल बासमवार यांना श्री देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रसार,विस्तार व पक्ष संघटन मजबुत करण्यात आपला प्रामाणिक सहभाग व पक्षहित कार्य असावे, यासह एक उमदा तालुका कार्याध्यक्ष पार्टीला लाभल्याने पक्ष संघटन आणखीन वाढेल यात आता शंका नाही, असे मत व्यक्त करित त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा सरचिटणीस रामकृष्ण वैद्य, वणी शहर अध्यक्ष विनोद भाऊ ठेगणे, कामगार सेल अध्यक्ष अर्जुन भाऊ शिरसाठ, ओबीसी सेल अध्यक्ष गुणवंत भाऊ टोंगे, महिला तालुकाध्यक्ष ज्योतीताई कोकणे, महिला वणी शहर अध्यक्ष सौ. मेघाताई मसेवार, वणी तालुका उपाध्यक्ष सौ.भाग्यश्री नागमोते यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी,कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. खुशाल बासमवार यांच्या निवडीबाबत सर्व राजकीय स्तरावरून शुभेच्छा सह अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे.