टॉप बातम्या

कार्ड धारकांना दिवाळीपूर्वी आनंदाचा शिधा पुरवठा करा - मनसेची एकमुखी मागणी

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगांव : तालुक्यातील गरीब प्राधान्य, शेतकरी, अंत्योदय कार्ड धारकांना दिवाळी आनंदाचा शिधा हा दिवाळीचा फुसका बार ठरत असल्याने ताबडतोड आनंदाच्या शिधा, जिवनाश्यक वस्तुचा पुरवठा लाभार्थ्यांना करावा अशी मनसेची एकमुखी मागणी तहसीलदार यांना निवेदनातून करण्यात आली. 

आदिवासी बहुल मारेगांव तालुक्यातील गरीब प्राधान्य, शेतकरी, अंत्योदय राशन कार्ड धारकांची दिवाळी अंधारात जावुन महाराष्ट्र शासनाने तिन महिन्याअगोदर दिवाळीत आनंदाचा शिधा जाहीर केला असतांना देखील पुरवठा विभागाच्या वेळास व मनमानी कारभाराने दिवाळी सणावर विरजन पाडले असून तेल, साखर, चणादाळ, पोहा, रवा या जिवनाश्यक वस्तुचा पुरवठा अजुनपर्यंत तालुक्यात झालेला नसल्याने मारेगांव तालुक्यातील गरीब कुटुंबाच्या तोंडाला पुरती पाने पुसली आहे, असा थेट आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष चांद बहादे यांनी केला आहे. 

मारेगाव तहसिल पुरवठा विभागाच्या ढिसाळ व मनमानी कारभाराने जनता त्रस्त झाली असून, संबंधीत अधिकारी कर्मचाऱ्यावर कठोर कार्यवाही करून शक्य तितक्या लवकर जिवनाश्यक वस्तुचा पुरवठा करावा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू असा ईशाराही दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी मनसे शहराध्यक्ष चांद बहादे, गजानन चंदनखेडे, विलास रायपूरे, ज्ञानेश्वर धोपटे, रामदास धानकी, सौरव सोयाम, हरीश झाडे, ईशांत दारुंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांची दिवाळी गोड होणार आहे, त्यामुळे लाभार्थ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही, 12 नोव्हेंबर पर्यंत सर्व आनंदाचा शिधा व जिवनाश्यक वस्तुचा पुरवठा मिळणार आहे.

- उत्तम निलावाड
तहसीलदार मारेगाव कार्यालय

Previous Post Next Post