सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : जिल्हा काँग्रेसचे सरचिणीस शरीफ अहेमद शफीक अहेमद कुरेशी (मुन्ना कुरेशी) यांच्या पार्थिवावर स्थानिक कब्रस्थान मारेगाव येथे आज अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
मुन्ना कुरेशी यांचे दीर्घ आजाराने बुधवारला दुपारी निधन झाले होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच मारेगावातील नागरिकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी धाव घेतली होती. गुरुवारी सकाळी झालेल्या अंत्यसंस्कारावेळी काँग्रेस नेते वामनराव कासावार, रंगनाथचे अध्यक्ष अॅड.देविदास काळे, माजी सभापती नरेंद्र पा. ठाकरे, प्रा.टिकाराम कोंगरे, डॉ महेंद्र लोढा, नगराध्यक्ष डॉ मनिष मस्की, वसंत जिनिंग चे अध्यक्ष आशिष खुलसंगे, सभापती गौरीशंकर खुराणा, कॉ ता. अध्यक्ष मारोती गौरकार, नगरसेवक शंककराव मडावी, तथा वणी विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षांचे व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.
मुन्ना भाई कुरेशी हे अभ्यासू नेते म्हणून परिचित होते. ते जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदावर आरूढ होते. त्यांचा सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रात निकटचा सबंध असतांना या त्रिसूत्री चळवळीचे अग्रणी म्हणून त्यांनी तालुक्यात आपली वेगळी छाप अधोरेखित केली होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने जिल्ह्यासह मारेगावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शरीफ अहेमद शफीक अहेमद कुरेशी (मुन्ना कुरेशी) अनंतात विलीन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 08, 2023
Rating: