सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : महाराष्ट्र राज्यातील संगणक परीचालक प्रामाणिकपणे आपले कामे करतात. मात्र, त्यांना काम तोकड्या मानधनात करावे लागत असल्यामुळे या महागाई च्या काळात सद्यस्थीतीचा उदरनिर्वाह होऊ शकत नसल्याने सध्या मिळत असलेल्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी निवेदनातून मागणी महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत मध्ये काम करणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्रचालकांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पद्माकर मडावी यांना करण्यात आली.
निवेदनाचा आशय असा की, महाराष्ट्र राज्यातील शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञात विभागाच्या माध्यमातून आपले सरकार सेवा केद्र या प्रकल्पात राज्यातील सर्व ग्रामपंचायती स्तरावर संगणक परिचालक म्हणून हजारो संगणक परिचालक डिजिटल महाराष्ट्राचे काम करत आहेत. राज्यातील संगणक चालक साधारण सर्व प्रकारचे ऑनलाईन व ऑफलाईन कामे प्रामाणिकपणे करत असल्यामुळे शासनाच्या सर्व योजना जनतेपर्यत पोहोचविण्याचे काम ज्यांच्या माध्यमातून होत आहे, परंतु केंद्र चालकांना पाहिजे तसे मानधन मिळत नसल्याने त्यांच्या वर उपासमारी वेळ आली आहे. त्यामुळे मारेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये काम करणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्र परीचालकांनी आज दिलेल्या निवेदनातून मानधनात वाढ करण्यात यावे,अशी मागणी करून सरकार प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.
संगणक परिचालक यांच्या प्रमुख मागण्या
१. आकृतीबंधात समाविष्ठ करण्यास कालावधी लागत असल्यास किमान मासिक २० हजारपर्यंत वेतन सद्यस्थितीत देण्यात यावे.
२. महाराष्ट्रातील सर्व संगणक परीचालकांचा आकृतीबंधात समावेश करुन वेतन महिन्याच्या निश्चीत तारखेस देण्यात यावे.
३. नियम बाहय कामे लावताना संदर्भीय पत्रान्वये ग्रामविकास विभागाची पूर्व परवानगी घेऊन त्याचा वेगळा मोबदला देण्यात यावा.
४. सद्यस्थितीत कामाच्या बाबतीत दिलेले टार्गेट सिस्टिम पूर्णपणे बंद करण्यात यावी.
५. येत्या दिवाळी सणापूर्वी मागील दोन महिन्याचे प्रलंबित मानधन तत्काळ देण्यात यावे.
सदरील मागण्या विहीत कालावधीत पुर्ण न केल्यास महाराष्ट्रभर संविधानीक पध्दतीने पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या कार्यालयासमोर व विधानसभा सदस्य यांच्या निवास्थाना बाहेर संविधानीक पध्दतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करुन, येणाऱ्या काळात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मागण्यापूर्ण होईपर्यंत मोर्चा व आमरण उपोषण करण्यात येईल असा ईशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचे मारेगाव तालुका अध्यक्ष देवानंद कनाके, विकास राऊत, सतीश बोथले, सुमित शेंडे, राहुल आवारी, विकास चौधरी, जितेंद्र गेडाम, रविंद्र टोंगे, राहुल काकडे, विकास दडांजे, राहुल टेकाम, चंद्रशेखर दातारकर, स्वप्नील कडू गणेश आसूटकर आदींची उपस्थिती होती.