सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : मार्डी ते मारेगाव बस फेरी चालू करण्यात यावे, यासाठी शिवसेना (उबाठा) च्या वतीने वणी आगार प्रमुखाकडे निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र यासाठी बरीच प्रतीक्षा करावे लागत असल्याने शिवसेनेने मागणीचा आक्रमक पवित्रा घेताच महामंडळ विभागाला जाग आली आणि अखेर काल दि.10 नोव्हेंबर 2023 पासून मार्डी ते मारेगाव बस फेरी ला सुरुवात करण्यात आल्याची माहिती मारेगाव नगर पंचायत चे नगराध्यक्ष डॉ मनिष मस्की यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून मार्डी ते मारेगाव विद्यार्थी व परिसरातील लोकांकरिता महामंडळ ची बस फेरी उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना अवैध खासगी वाहनाने जिव मुठीत घेऊन प्रवास करावा होता. त्यामुळे या मार्गाने बस फेरी चालू करावी अशी मागणी शिवसेना (उबाठा) मारेगाव तालुक्याच्या वतीने वणी आगार प्रमुखांकडे पत्रव्यवहार केला. त्या मागणीला अनुसरून शुक्रवार रोजी मार्डी-मारेगाव बस फेरी चालू करण्यात आली.
दरम्यान, मारेगाव येथील मार्डी चौकात बस चालक तथा वाहकाचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. त्यावेळी शिवसेने (उबाठा) चे पदाधिकारी व शिवसैनिक व युवासैनिक आदी उपस्थित होते.