सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत एकूण 91 उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले होते. त्यापैकी 11 उमेदवारी अर्ज छानणी मध्ये बाद झाले. तर 46 उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतले. त्यामुळे उर्वरित 34 उमेदवारी अर्ज कायम राहिले. यात अनुसूचित जाती जमाती मध्ये एकच अर्ज कायम राहिल्याने विश्वनाथ आत्राम हे एकच नाव राहिल्याने या प्रवर्गातील जागा बिनविरोध निघण्याच्या मार्गांवर आहे. तर सहकारी संस्था गटामध्ये महिला राखीव मधून 2 जागेसाठी 3 उमेदवारी अर्ज कायम आहे.
सहकारी संस्था गटामध्ये एकूण 11 जागा आहेत. त्यापैकी सर्वसाधारण मतदार संघात एकूण 7 जागा असून एकूण 14 अर्ज आलेले आहे. इतर मागासवर्गमध्ये एका जागेसाठी दोन उमेदवारी कायम आहे. महिला प्रतिनिधी वर्गात दोन जागेसाठी 3 अर्ज कायम आहे. अनुसूचित जमाती मतदार संघात एका जागेसाठी दोन उमेदवारी कायम आहे.
ग्रामपंचायत मतदार संघामध्ये सर्वसाधारण मध्ये दोन जागेसाठी 4 उमेदवारी अर्ज कायम आहे. आर्थिक दुर्बल घटकमध्ये एका जागेसाठी दोन उमेदवारी कायम असून, अनुसूचित जाती-जमाती मतदार संघामध्ये एका जागेसाठी एकच अर्ज कायम आहे. व्यापारी अडते मतदार संघामध्ये दोन जागेसाठी चार उमेदवारी कायम आहे. तर हमाल मापारी मतदार संघात एका जागेसाठी दोन उमेदवारी कायम आहे.
या निवडणुकीत काँग्रेस सेना समर्थीत महाविकास आघाडी तर भाजप, शिंदे (गट) मिळून लढत आहे. तूर्तास दोन्ही पॅनल 'बाहुबली' वाटत असले तरी, शेवटी कोण? बाजी'राव मारणार हे येणारा काळच सांगेल.
मारेगाव कृउबा निवडणूक: दोन पॅनल मध्ये यंदा चूरशीची लढत
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 20, 2023
Rating:
