टॉप बातम्या

आनंदाचे डोही "आनंद" तरंग

                 
                     अ|भि|ष्ट|चिं|त|न वा|ढ|दि|व|स 

'आनंदाचे डोही, आनंद तरंग।
आनंदचि अंग, आनंदाचे'

असे आनंदावस्थेचे स्वरूप तसे आमचे परम मित्र "आनंदराव" म्हणजे आनंद नक्षणे. अगदी मौज मस्तीच्या काळात वडिलांचे छत्र हरवल्यानंतर स्वतः च्या पायावर उभे राहून वाट्याला आलेल्या कुटुंबाची खंबीरपणे आपली जबाबदारी पेलणारे, म्हणजे ते आनंद भाऊसाहेब.... आता तर मनमिळाऊ दिलखुलास व्यक्तिमत्व आम्ही अनुभवतोय हे त्रिवार सत्य. शहरातील सुपरिचित सलून व्यावसायिक ते निर्भीड,निष्पक पत्रकारिता असा त्यांचा आनंददायी  लेखणीचा प्रवास...यापुढे ही आनंदमय जावो हिच. मनस्वी सदिच्छा..

त्यांच्या नावाप्रमांणे त्यांच्या वागण्यात, बोलण्यातच खरा आनंद दडलेला, निरव शांततेचा आभास घडवणारी "कातरवेळ" तो "चिल्ड" अनुभव असल्यामुळे या जन्मदिनी त्यांच्या स्वानुभवाचा आम्हास लाभलेला स्पर्श आहे. या शुभदिनी उत्कट क्षणी बहरलेली 'आनंद' ही अंतर्बाह्य सलग आणि एकच भावजाणीव म्हणजे आनंद नक्षणे....

अशा या उमद्या पर्मोच्चआनंद दिलखुलास व्यक्तिमत्वाला उदंड आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा..!!

आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना
पुनःश्च वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक खूप खूप शुभेच्छा..!

शुभेच्छुक :- सह्याद्री चौफेर, परिवार 

Previous Post Next Post