मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वाढदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आज वाढदिवसानिमित्त आज शुभेच्छांचा वर्षाव झाला. राज्यभऱ्यासह जिल्ह्यातील वणी,झरी,मारेगाव तालुक्यात त्यानिमित्त रुग्णांना फळ वाटप, रोगनिदान शिबीरे, यासारख्या समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी शुभेच्छा देवून अभिष्टचिंतन केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याची छायाचित्रे, ध्वनीचित्रफिती विविध समाजमाध्यमांवरही झळकली. 

वाढदिवस साधेपणाने साजरा करतानाच विविध समाजोपयोगी उपक्रम, कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून वणी झरी मारेगाव येथील विविध ठिकाणी फळ वाटप, रोगनिदान शिबीर, अशा अनेकविध मोहिमांचे आयोजन करण्यात आले.
Previous Post Next Post