टॉप बातम्या

मारेगाव नगरपंचायतीमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : येथील सभागृहामध्ये काल नगरपंचायत विषय समिती सभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली.

मारेगाव नगर पंचायतचे नगराध्यक्ष डॉ मनिष मस्की यांच्या उपस्थितत बांधकाम सभापतीपदी नंदेश्वर आसुटकर, आरोग्य सभापती पदी शेख अंजुम शेख नबी, पाणी पुरवठा समिती सभापती पदी जितेंद्र नगराळे, तर महिला बाल कल्याण समिती सभापती पदी हर्षा महाकूलकर तर उपसभापती पदी अनिता परचाके यांची निवड झाली.

विशेष उल्लेखनीय की, यावेळी निवडप्रक्रियेत नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली. या निवडीबद्दल सर्व नवनिर्वाचितांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();