माझं गाव,माझा वक्ता मध्ये पत्रकार सागर मुने

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : विदर्भ साहित्य संघ व नगर वाचनालय, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकप्रिय झालेल्या व्याख्यानमालेत गुरुवार दि. २३ फेब्रुवारी रोजी सायं. ७ वाजता व्यावसायिक व पत्रकार सागर मुने यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्या व्याख्यानाचा विषय 'थोरलं राजं सांगून गेलं' हा आहे. पत्रकार व नाट्यकर्मी मुने यांच्या या पहिल्याच व्याख्यानाचा लाभ बंधुभगिनींनी बहुसंख्येने घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.