सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : आज देशभरात 'व्हॅलेंटाईन डे' म्हणजेच प्रेमाचा दिवस साजरा केला जात असतांना आपल्या प्रियकरा विरोधात प्रियशीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून प्रियकराला गजाआड धाडल्याची घटना समोर आली.
गणेशपूर (ता.वणी) येथील 24 वर्षीय युवक व मारेगाव येथील 23 वर्षीय युवती यांचे मागील चार ते पाच वर्षांपासून सूत जुळले होते. एकमेकांनी 'दिल हैं के मानता नही', म्हणत भेटीगाठी तसेच तुझ्या साठी काय पण...अशातच प्रेमाचे बंध घट्ट होत गेले अनं 'प्रेम अगन' च्या विरहात दोघेही 'दो बदन' झाले.
प्रेयसी कडून मागील काही दिवसांपासून लग्नाचा तगादा सुरू झाला. प्रियकराने नकार देत प्रेमाच्या नात्यात 'अकेले हम अकेले तुम' ची भूमिका घेतली खरी, परंतु 'दिल तो पागल हैं' असं म्हणतात आणखीन 'शिकवा करू शिकायत करू पर मै तुझीसे मोहब्बत करू' अशा आणाभाका घेत प्रेमाला बहर आला. पुन्हा तिच्या कडून 'चल शादी कर लेते हैं'. गाण वाजू लागले, परंतु त्याने 'अकेला'ची भाषा केल्याने प्रियशी संतापली.
'कब तक चूप रहुंगी' म्हणत तीने संबंधितांना घेऊन थेट मारेगाव पोलिस स्टेशन मध्ये धडकली. मात्र, तो नात्यातलाच असल्याने प्रियकराला ठाण्यात बोलावून ठाणेदार राजेश पुरी यांनी कायद्याच्या परिणामांची दोघांना भूमिका पटवून दिली. 'दोनो के इश्क में कोई कमी नही' हे लक्षात घेतल्याने पुढे शुमंगलम सावधान! होणारच.... दोन्ही बाजूनी संतापाचा सोडला सुटकेचा निश्वास!... परंतु मुलीकडील एकाने 'आग' ओकली अनं क्षणात 'दिल विल प्यार व्यार' तक्रारीत दाखल झाले. मागील पाच वर्षात 'तू मेरी मै तेरा, दुनिया से क्या लेना' गाणं वाजवणारा अंकित हनुमान सोयाम यांचेवर लैंगिक अत्याचाराचा 376 गुन्हा दाखल होत तो जेरबंद झाला.