सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
येथील नगर परीषद लगत असलेल्या कापड दुकानाच्या गल्लीत वरली मटका सुरू असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांना मिळताच त्यांनी सपोनि माधव शिंदे आणि पथकाला सदर ठिकाणी पाठविले असता, सदर पथकाने सट्टा मटका अड्यावर धाड टाकून अनिस शेख हमीद शेख (27), रा.पंचशील नगर, अहमद अली रजाक अली बेग (55), रा दिपक चौपाटी, आशिद खान अजर उल्ला खान (33) रा. गुरूनगर (वणी) या तिघांना 14 हजार चारशे 50 रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार, पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक माधव शिंदे आणि पथकांनी केली आहे.