टॉप बातम्या

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेची नवीन कार्यकारिणी गठीत

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगांव : येथील पोलीस स्टेशन च्या प्रांगणात पोलीस पाटील दिनांचे औचित्य साधुन महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेची राज्याध्यक्ष महादेव पाटिल नागरगोजे व जिल्हा अध्यक्ष रूपेशभाऊ सावरकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नविन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यात जिल्हा कार्याध्यक्ष पदी श्री भाऊरावजी टेकाम पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पदी डॉ प्रशांत पाटील, तर महिला जिल्हा उपाध्यक्षा पदी मेघाताई ढवस पाटील यांची नियुक्ती केली.
तसेच तालुका कार्यकारिणीत तालुका अध्यक्ष पदी श्री संतोष निब्रड पाटील, सचिव पदी श्री प्रमोद चौधरी पाटील, सहसचिव पदी श्री जुमनाके पाटील, कोषाध्यक्ष पदी फरताडे पाटिल, ता. पदी संघटक श्री अजय ताजणे पाटील, तर सदस्य म्हणून श्री अशोक बोढे पाटील, श्री गाडगे पाटील, श्री अनिल रामपुरे पाटील, श्री अलाम पाटील, सौ वैशाली गंधारे पाटील, सौ सयाम पाटील, सौ.उज्वला पाटील, सौ.गिरी पाटील, सौ रोगे पाटील, सौ.काळे पाटील, सौ.उईके पाटील, श्री मेश्राम पाटील, श्री धानकी पाटील, सौ गवळी पाटील, श्री डुकरे पाटील, श्री वनकर पाटील, श्री भोयर पाटील, श्री बोडणे पाटील, मा श्री नित पाटील, श्री आस्वले पाटील, श्री रामजी पाटील टेकाम, श्री सुभाष पाटील रामपुरे यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन लाभलेले राज्य अध्यक्ष मा श्री महादेव नागरगोजे, मा श्री रुपेश भाऊ सावरकर जिल्हा अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी अध्यक्ष महोदयांनी पोलीस पाटील यांचे अधिकार व जबाबदारी काय आहे,तसेच पोलीस पाटील यांनी कुठलाही भेदभाव न करता निपक्षपणे कार्य करावे, याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री अजय ताजणे पाटील, तर आभार प्रदर्शन श्री निब्रड पाटील यांनी केले. त्यानंतर स्नेह भोजनाचा आस्वाद घेवून सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();