सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
निखिल हनुमान भोजेकर (24) रा चनाखा व सैफुद्दीन जलाउद्दीन सय्यद (22) रा शिंदोला ता वणी असे चंद्रपूर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपिंचे नावे आहेत. हे दिघेही सध्या चंद्रपूर पोलिसांच्या कोठडीत आहे. या आरोपीकडून वणी तालुक्यातही अशाप्रकारे कुठे बनावट नोटांची विक्री केली का? याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
चणाखा येथील निखिल भोजेकर नावाची व्यक्ती अनेक दिवसापासून कमी किमतीत नकली नोटांचा पुरवठा करित असून, तो चंद्रपूर जिल्ह्यात बनवट नोटा चलनात आणत असल्याची माहिती चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेने राजुरा ते असिफाबाद मार्गांवरील रेल्वे लाईनजवळ सापळा रचला. सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर व मारोती आटिंगा वाहणाला थांबवून तपासणी केली असता,वाहनमध्ये पोलिसांना पाचशे रुपयाचे बंडल आढळले. हे बंडल ओळखता येवू नये म्हणून मागेपुढे चालनातील नोटा लावण्यात आले होते.
आरोपीविरुद्ध भांदवी ४२० व ३४ कलमअंतर्गत राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जणबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर,संजय आतकुलवार, संतोष एलपुलवार, नितीन रायपुरे आदींनी केली.