सह्याद्री चौफेर | न्यूज
प्रतीक किशोर पावडे (21) रा वागदरा (जुना) असे गळाफास घेवून आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. दुपारी दोन वाजता च्या सुमारास प्रतीक बाहेरून आला समजते, दरम्यान घरी कोणीच नसल्याचे पाहून त्याने राहत्या घरीच गळाफास घेवून आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. प्रतीक च्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून त्याचे पश्चात आई वडील व एक भाऊ असा आप्त परिवार आहे.