टॉप बातम्या

सावित्री जिजाऊ दशरात्रोत्सव कडून बक्षिस वितरण

सह्याद्री चौफर | योगेश मडावी

झरी जामणी : सावित्रि जिजाऊ दशरात्रोत्सव कार्यकम निमीत्त घेण्यात आलेल्या स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंत इंग्लिश मिडीयम स्कूलचे संचालक संकेत उदकवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक जगदीश आरमुरवार, बूटे, परचाके, बूच्चे, वडके, अतुल विधाते, जगदीश वराटे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवातीला स्मिता बूच्चे, प्रांजली नाकले, विद्या चेलपेलवार यानी जिजाऊ वन्दना सादर केली.

 दशरात्रोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा, एक पात्री प्रयोग, वेशभूषा स्पर्धा, नृत्य स्पर्धा, एक मिनीट स्पर्धा, गोळा फेक इत्यादि स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात आले. मान्यवरांनी आपल्या भाषणातून सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले. ता. ४ जानेवारी ला आरोग्य तपासणी आयुर्वेद ड्रॉ सौ. जिद्देवार पांढरकवडा यांनी केली. सर्व महिलानी कार्यक्रमामध्ये उस्फुर्त असा सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रविणा काकरवार, ममता पारखी, सचिता वराटे, टीना पालीवाल, सुजाता गेडाम, शारदा मंदुलवार, स्नेहल कापनवार, संतोशी दरबेशवार, दुर्गा डब्बावार, नीता मुडे, शीतल मुसळे, ज्योती माहुरे, वर्षा वराटे, वैशाली बोळकुंटवार, रुपाली ऊदकवार, रंजना बरशेेट्टीवार, राधा देवढगले, संतोषि ताडुरवार, मनीशा ताडुरवार, अंजली पारखि, सरिता विधाते, सीमा काळे, राधा गोडे, प्रतिभा मेश्राम, प्रतिभा आवारी, कल्पना परचाके, कल्पना पवार, कुळमेथे मैडम, अर्चना पोलशेत्टीवार, ललिता मूत्तेलवार यानी परिश्रम घेतले. कु. संतोषि बूचे, कु. तनुजा माहुरे, कुु. रुचीता कुळमेथे यांचे विशेष सहकार्य लाभले त्यामुळे त्यांचा सुध्दा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();