भव्य शुभारंभ : न्यू पारस गंधर्व

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : खरं तर आपण सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, आपल्या सहकार्यातून विदेही सद्गुरु जगन्नाथ महाराज यांचे कृपेनें दिनांक 1 फेब्रुवारी 2023 रोज बुधवार पासून "न्यू पारस गंधर्व" फ्लाय ऍश ब्रिक्स अँड सिमेंट पेवर चा शुभारंभ संपन्न होत आहे. हा शुभारंभ आदर्श उपक्रम म्हणून पुढे ठरावा या उदात्त हेतूने येथील कामगारांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. हे विशेष..

आमच्या या नव्याने सुरू होत असलेल्या उद्योगाला आपण माझे सहकारी मित्र तथा स्नेही म्हणून उपस्थित राहाल अशी मी आणि माझ्या सोबत असलेला सहकारी मित्र आपण सर्वांची येण्याची वाट पाहतो आहे.
येत्या बुधवार ला नांदेपेरा रोड रसोया फॅक्टरी च्या समोर वणी येथे दुपारी 1 वाजता पूजन. त्यानंतर लगेचच दु. 2 ते 5 या वेळात स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तेव्हा आपण सहकुटुंब सहपरिवार या भव्य शुभारंभाला आवर्जून यावे असे, न्यू पारस गंधर्व चे संचालक अविनाशभाऊ लांबट व प्रवीणभाऊ बोथले यांचे तर्फे आग्रहाची विनंती करण्यात येत आहे. 
Previous Post Next Post