टॉप बातम्या

मच्छिन्द्रा येथील सरपंचांना ग्रामपंचायत'चा पडला विसर


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : गेल्या सप्टेंबर मध्ये तालुक्यातील "पेसा" च्या ग्रामपंचायतीची निवडणूक संपली आणि पाहता पाहता दोन ते तीन महिने कसे निघून गेले हे कळलेच नाही. मात्र, या दोन अडीच महिन्याच्या कालावधीत मच्छिन्द्रा गट ग्रामपंचायतची पहिलीच ग्रामसभा मागील १ डिसेंबरला पार पडली. या सभेत विविध पेसा अंतर्गत समित्या गठीत करण्यात आल्या. याच सभेला मच्छिन्द्रा, फेफरवाडा व बामर्डा ग्रामस्थांनी आपल्या विविध समस्याचे लेखी स्वरूपात निवेदनं दिले. तर काहींनी आपल्या समस्या तोंडी मांडल्या. परंतु दहा बारा दिवस लोटून गेली तरी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच नागरिकांच्या समस्या सोडवतील की, नाही अशी कुणकुण ऐकायला मिळत आहे.

सरपंच ह्यांनी ग्रामपंचायतमधील जनतेच्या समस्या सोडून नेत्याच्या कार्यक्रमालाच जास्त दिसत असतात, हे विशेष....'नया खून हैं, नया उमंग हैं' असे आहेत आमचे सरपंच साहेब. हिच एनर्जी गावातील समस्या आणि कामाकडे लावली तर बरं होईल.. या आधी कोण काय केलं यापेक्षा आपनास हे करायचे आहे, आणि हेच महत्वाचे आहे हे लक्षात घेतलं पाहिजेत. कारण गावात अनेक समस्या आहेत. त्यात महत्वाचे म्हणजे रस्त्यावरील सांडपाणी, या सांडपाण्यामुळे कित्येकांनी आपले हात'पाय मोडून-जोडून घेतले आहे. अनेकदा तर दुचाकीने व पायदळी चालताना अपघात सुद्धा झाले आहेत. ह्या गंभीर समस्या असतांना याकडे सरपंच साहेब लक्ष तुमचं आहे की, नाही असा थेट प्रश्न उपस्थित होत आहे.निवडून आल्यापासून सरपंच फक्त मिटिंगला दिसतात बाकीचे दिवस कुठे...? विशेष उल्लेखनीय की, सध्या मच्छिन्द्रा शेत शिवारात रान डुक्करांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून शासन स्तरावरील काही योजनेअंतर्गत मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना कागदपत्रासाठी धावपळ करावी लागतात, यासाठी आपल्या स्वाक्षरी ची नितांत गरज पडते,तसेच शालेय कामासाठी लागणारे विद्यार्थ्यांना दाखल्या वर सही हे सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. त्यामुळे सरपंच व सचिवांची सोबतच संगणक ऑपरेटर यांची मुख्य ग्रामपंचायत कार्यालयाला उपस्थिती किमान रोज तास दोन असणं आवश्यक आहे. हे सांगायची वेगळी गरज नाही.

मागील आणि या महिन्यात महिलांनी धाडस करित गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी मोठा एल्गार पुकारला, गावापातळीवरून थेट विषय मारेगाव पोलीस स्टेशन, तर उपविभागीय अधिकारी वणी यांच्या दालनात पोहचला. परंतु तीळमात्र, सरपंच साहेब कधीच गावाकडे फिरकले नाही. विशेष म्हणजे, निवडून आल्या पासून वार्ड क्र 2 चे सदस्य येथील वाटर फिल्टर मशीन सुरू करण्यासाठी सातत्याने धडपड आहेत त्या कामानिमित्त ते त्यांना फोन करतात त्यांचे कॉल रिसिव्ह केल्या जात नाही असे ग्रामपंचायत सदस्य महेश मुसळे यांनी सांगितले आहे. तसेच नागरिक सुद्धा त्यांना संपर्क साधत असतात मात्र, त्यांना बाहेर आहो, इथे आहो तिथे आहो असे कारण समोर येतेय, त्यामुळे इकडे का? फिरकत नसल्याने शंका निर्माण होत आहे.

यंदाची निवडणूक ही ऐतिहासिक झाली, चक्क सरपंचांसाठी दहा उमेदवार उभे होते. त्यात विद्यमान थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आले. अन सदस्य नामधारी झाले, आता सरपंचाना विशेष अधिकारही मिळाल्याने "हम करे सो कायदा" असे तर नाही ना! असेही बोलल्या जात आहे. आपण कोण्या एका गावचे नसून गट ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख आहात हे विसरता कामा नये.... तूर्तास मागील ग्रामसभेला प्राप्त झालेल्या निवेदनस्वरूपी समद्या समस्या मार्गी किंबहुना सोडवाव्या हिच अपेक्षा असून समस्त ग्रामस्थांचे "सरपंच" गावात केव्हा 'वॉक' करतील याकडे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();