सह्याद्री चौफेर | चंदू राऊत
वणी : महाराष्ट्र क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेत टी. एस. ओ क्रीडा मंडळाच्या लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी चे 19 वर्षा आतील मुली, विजय प्राप्त करून विभागीय स्तरावर पोहोचण्याचा मान पटकाविला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातून वणी सारख्या छोट्या शहरातून संघ विभागीय स्तरावर जाणे हे मोठे यश मानले जाते. स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू विद्यार्थी टी. एस. ओ क्रीडा मंडळाच्या मैदानावर वरिष्ठ खेळाडूंच्या मार्गदर्शनात नियमित सराव करीत असतात. या यशामागे आकाश कावडे, राजू,रींगोले तसेच टी. एस. ओ क्रीडा मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू परिश्रम घेत आहे. तर मयूर पिदूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणीचे चे शैलेश बावणे सर, तालुका क्रीडा अधिकारी सचिन मिलमिले, तालुका क्रीडा अधिकारी यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.