टॉप बातम्या

रात्रीच्या अपघातातील दुसऱ्या भावाने वाटेतच सोडला श्वास


सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : सालईपोड येथून गुरुवारला दिवसभर शेतीचे कामे आटोपून खासगी कामांकरिता सायंकाळी मारेगावकडे दुचाकीने दोघेही सख्खे चुलत भाऊ निघाले. अन अघटीत घडले. राज्य महामार्गांवर नादुरुस्त उभा असलेल्या ट्रकला कोणतीही दिशादर्शकाचे संकेत नसल्याने दोन भावडांची दुचाकी मागावून काल रात्रीला ट्रक वर आदळली. यात एक भाऊ जागीच ठार झाला, तर दुसऱ्याचा उपचारार्थ नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला. या घटनेने टेकाम परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

राज्य महामार्गावर दोन दिवसांपूर्वी एम.एच.34 ए. व्ही.3859 कोळशाचा ट्रक पलटी झाला होता. त्याला उभा करीत कोणतेही दिशादर्शक संकेत नसताना अंधारात हा ट्रक दोन भावा साठी काळ ठरला असल्याचे बोलले जात आहे.    
मारेगाव तालुक्यातील सालईपोड येथील मोठ्या वडिलाचा मुलगा रामकिसन लखमा टेकाम (40) व हरिदास लक्ष्मण टेकाम (30) हे दोघे चुलत भाऊ खासगी कामानिमित्त दुचाकीने मारेगावला निघाले होते. खडकी फाट्यानजीक अपघातग्रस्त ट्रक मार्गावरील नियम धाब्यावर ठेवून उभा असतांना गुरुवार दि.१५ डिसेंबर ला रात्री ८ वाजताचे दरम्यान, ट्रक ला दुचाकी धडक दिली. यात अवघ्या दिवसावर साक्षगंध असलेल्या हरिदासचा जागीच करून अंत झाला. त्याचे पाठीमागे आई वडील, भाऊ, बहिणी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

त्यासोबत गंभीररित्या जखमी झालेला मोठ्या वडिलाचा मुलगा रामकिसन टेकाम याचा पुढील उपचार्थ चंद्रपूर येथे नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला. रामकिसन याचे पश्चात आईवडील, पत्नी व दोन चिमुकली मुले आहेत. टेकाम कुटुंबात हरिदासचे लग्न जुळलेल्या सोहळ्याची तयारी सुरू असतांना आनंदावर विरजन पडले. या घटनेने सालईपोड परिसरात पुरती शोककळा पसरली आहे.

राज्यमहामार्गावर रात्रीच्या वेळी कोणतेही दिशादर्शक संकेत नसलेले वाहने उभे ठेवून काटेकोर नियमांची पायमल्ली ही सर्वश्रुत असतांना छोट्या वाहनधारकासाठी हे उभे ट्रक काळ ठरत आहे.
-सामाजिक कार्यकर्ते तथा जय भीम उत्सव समिती अध्यक्ष हेमंत नरांजे 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();