सह्याद्री चौफेर | रवी घुमे
मारेगाव : पांदन रस्ते म्हणजे सर्व शेतकऱ्याच्या संमतीने आपापल्या शिवारातून शेतमालाची किंवा शेतअवजाराची ने-आन करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले कच्चे रस्ते. अशा रस्त्याने पावसाळ्यात पाणी वाहून जात असते. पावसाळ्या नंतर हेच रस्ते शेती संबंधित वाहतूक करण्यास मोकळे होतात. मात्र, वेगांव ते वडगांव हा पांदन रस्ता नवरगांव मध्यम प्रकल्पाचे दुर्लक्षितेचा शिकार झाला आहे. ह्या पांदन रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याने रस्त्याने चालणे कठीण झाले आहे.
शेतकऱ्यांना कुठलीच कार्यालयीन वेळ नसते. अमुक वेळेस शेतात जायचे आणि ठरल्या वेळेस घरी परतायचे असे वेळेचे बंधन नसल्याने कधी दुपारी, कधी संध्याकाळी तर कधी भल्या पहाटेच, कधी रात्री बेरात्री शेतात गरजे नुसार जावे लागते. थंडीचा सपाटा वाढला आहे. वातावरणात गारठा जोर धरू लागला आहे. अशातच पायाकडून देखील प्रकल्पाच्या थंडगार पाण्याचे चटके घेत बळीराज्याला नाईलाजास्तव पाणी तुडवत जावेच लागते.
वेगांव ते वडगांव (ऊजाड) पादन रस्त्याने नवरगांव मध्यम प्रकल्पाचे पाणी ओसंडून वाहत असल्यामुळे ये-जा करनाऱ्यांना नाहक त्रास करावा लागत आहे. याकडे संबंधितानी जातीने लक्ष घालुन पाण्याची विल्हेवाट लावावी अन्यथा वेगांव वासी व ये-जा करणारे शेतकरी शेतमजुर तसेच वडगांव हनुमान मंदिराकडे जाणाऱ्याकडून आंदोलन करण्यात येईल असे, सह्याद्री चौफेर ला माहिती दिली. पुढे असेही त्यांनी सांगितले की, रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्याची तात्काळ विल्हेवाट लावली नाही तर तहसिलदार पुंडे साहेब यांना निवेदन देण्यात येईल...व आंदोलन तीव्र छेडण्यात येईल..