सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार
सावली : वनपरिक्षेत्र अधिकारी, सावली अंतर्गत येणाऱ्या गावातील जंगलाकडे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी ७ पिंजर्यासह जंगलाच्या दिशेने रवाना झाले. सलग दोन दिवस, रुद्रापुर येथील एक व्यक्ती आणि खेडी येथील एक महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना घडली आणि काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सतत होणारे वाघाचे हल्ले व नागरिकांचे जाणारे जीव ही चिंतेची बाब असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. सुधिर मुनगंटीवार यांनी वाघांचा बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा निलंबनाच्या कार्यवाहीचे आदेश दिलेले आहे. त्यामुळे वन अधिकारी व कर्मचारी नरभक्षक वाघास जेरबंद करण्यासाठी दिवसरात्र रेस्क्यू आॅपरेशन राबवित आहेत. सतत होणार्या वाघाच्या हल्ल्याच्या घटनेमुळे सावली परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.