टॉप बातम्या

सहाय्यक अभियंता मसुद शेख यांना सेवानिवृती निमित्त निरोप


सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

झरी जामणी : महावितरण उपविभागीय कार्यालय झरी जामणी येथे कार्यरत असलेले सहाय्यक अभियंता (गुण नियंत्रण) मसूद शेख यांचे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती झाल्यामुळे त्यांना पांढरकवडा विभागातील अभियंते व उपविभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत येथील पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात भावपूर्ण निरोप देण्यात आला.
       
सहाय्यक अभियंता मसूद शेख हे मागील साडेतीन वर्षापासून झरी जामणी येथील उपविभागीय कार्यालयात व पांढरकवडा येथे नऊ वर्ष सहाय्यक अभियंता गुण नियंत्रण या पदावर पांढरकवडा विभागात बारा वर्षे काम केले. तर चंद्रपूर जिल्ह्यात २२ वर्षे सेवा दिली असे एकूण ३४ वर्षे ५ महिने सेवा देऊन निवृत्त झाले. विशेष म्हणजे झरी जामणी सारख्या दुर्गम भागात मुख्यालयी राहून त्यांनी काम केले.
महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात सहाय्यक अभियंता गुण नियंत्रण हे अतिशय महत्त्वाची जबाबदारी निभावणारे पद त्यांच्याकडे दर महिन्यात उच्चदाब ग्राहकांचे रीडिंग घेणे, वीज चोरी शोध मोहीम राबवून विद्युत हानी कमी करणे, सदोष मीटरचे प्रमाण कमी करुन उपविभागाचे महसुल वाढविणे. ही सर्व कामे मसूद शेख यांनी अतिशय प्रामाणिकपणे व चोखपणे अगदी सेवेच्या शेवटच्या दिवसापर्यंत पार पाडली असे उपकार्यकारी अभियंता मांगीलाल राठोड यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले.
      
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान पांढरकवडा उपकार्यकारी अभियंता विनोद मानकर यांनी भूषविले. त्यांनी निरोपमुर्ती मसूद शेख यांचे पत्नी पत्नीसह त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी निरोपमुर्ती शेख यांच्या परिवारातील सर्व सदस्य तसेच विभागीय कार्यालयातील अभियंते वासनकर, चेले, बोकाडे, देशमुख, राजेश जिझिलवार, ईवनाते यांच्यासह उपविभागातील अभियंते हेमंत लटारे, पंकज नंदलवार, सचीन महल्ले सह कर्मचारी देवगडे, कापसे, सिडाम, खोले, जगदिशा कुमरे, सुवर्णा बंडेवार इत्यादीसह वीज मित्र दत्ता परचाके उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन उपकार्यकारी अभियंता मांगीलाल राठोड यांनी केले. संचलन वरीष्ठ तंत्रज्ञ प्रविण अलोणे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्य तंत्रज्ञ रमेश मैदपवार यांनी केले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();