मारेगाव : तालुक्यातील देवाळा येथील ग्रामपंचायत उपसरपंच तसेच अखिल भारतीय सरपंच संघटनेचे तालुका सचिव सुरेश भाऊ लांडे यांना आज १० नोव्हेंबरला यांच्या वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा मनसेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या कडून देण्यात आल्या.
या प्रसंगी बोलतांना श्री लांबट म्हणाले की, योग्य मार्गदर्शन देणारे व्यक्तिमत्व तथा आमचे परममित्र यांचा अभिष्टचिंतन सोहळ्यात आम्ही सर्व सहभागी होऊन त्यांना उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करतो. आजचा दिवस खऱ्या अर्थाने अनेक समाजपयोगी कार्यांच्या पर्वणीचाच दिवस म्हटलं तर वावगं ठरणारं नाही !
भाऊंचे मार्गदर्शन आम्हाला नेहमी प्रेरणादायी असतात त्यांनी यापुढे आम्हाकरीता एक आशेचा किरण बनून सदैव आमच्या पाठीशी उभे राहावं असा आशावाद व्यक्त करित सप्रेम शुभेच्छा दिल्या..
यावेळी भाजप तालुका अधक्ष ज्ञानेश्वर चिकटे, प्रवीण बोथले सरपंच, चंदू जवदे सरपंच, प्रवीण नान्हे, प्रशांत चौधरी सरपंच, राहुल आत्राम, मारोती तुराणकर, आशिष खंडळकर, सुमित जुनघरी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या प्रसंगी उपस्थित व हितचिंतकांचे सुरेशभाऊ लांडे यांनी शतशः आभार मानून सैदव आपुलकी,प्रेम मला जगण्यास बळ देईल त्यासाठी सर्वांचे मनःपूर्वक खूप खूप आभार...