शुभ दिवाळी : समसस्त जनतेस दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा..!



क्रोध, मत्सर असो वा भय, ह्या सर्व नकारात्मक भावना आपल्या मनात गेल्या वर्षभरात जमा झाल्या असतील त्यांचा, फटाक्यांच्या रुपात स्फोट व्हायला हवा. तूमच्या मनात जर कुणाबद्द्द्दल काही नकारात्मक भाव असेेेल तर तो फटाक्या सोबत फोडून नष्ट करा, किंवा ज्या व्यक्तीबद्दल द्वेष असेल त्याचे नाव त्या फटाक्या वर लिहून फोडा व त्या सोबतच तो द्वेष नष्ट झाला असे समजा. पण आपण काय करतो? तो नकारात्मक भाव नष्ट करण्याऐवजी, त्या व्यक्तीलाच नष्ट करायला बघतो अथवा स्वतःला त्या भावनांच्या आगीत होरपळून घेतो.

नकारात्मक वाईट भावना फटाक्यांच्या स्फोटात नष्ट करा व त्या व्यक्तीसोबत नव्याने मैत्रीचा हात समोर करा. मग बघा, तुम्हाला आतून कसं हलकं फुलकं वाटेल व आनंद, प्रेम शांतीची अनुभूती लाभेल. त्या नंतर, त्या व्यक्ती सोबत तोंड गोड करा व दिवाळी साजरी करा. ती व्यक्ती नव्हे, त्याच्या अवगुणांचा फटाक्यां सोबत नाश करणे, हीच खरी दिवाळी होय. ह्या उत्सवाची सुरुवात कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी पासून होते.

"धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…"

दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…

शुभेच्छुक :- आकाश बदकी
नगरसेवक नगर पंचायत मारेगाव