लेफ्टनंट कर्नल वासुदेव दामोदर आवारी यांचे पार्थिव आज 06/10/2022 ला रात्रो 9.00 वाजेपर्यंत पोहोचणार वणीत


रवी घुमे | सह्याद्री चौफेर 
        
वणी : अरूणाचल प्रदेशातील चीनच्या सीमेवर ता.04/10/2022 ला विरगती प्राप्त झालेले वणीचे सुपुत्र ले.कर्नल वासुदेव आवारी यांचे पार्थिव विशेष विमानाने नागपूर येथे आज आणण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवास नागपूर येथे सैनिकी इतमामात मानवंदना दिल्यानंतर सैन्यदलाच्याच विशेष वाहनाने त्यांच्या स्वग्रुही टागौर चौक वणी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
उद्या ता.07/10/20022 ला त्यांच्या मुळ जन्मगावी मुर्धोनी ता.वणी जि.यवतमाळ येथे सकाळी 10.वाजेपर्यंत सरकारी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.
मुर्धोनी हे गांव वणी यवतमाळ रोडवर 4 कि.मि.अंतरावर पळसोनी (परसोडा) फाट्यापासून दक्षीणेला 1 कि.मी.अंतरावर आहे.