पुर परिस्थितीकडे लोकप्रतिनिधी व शासनाचे दुर्लक्ष!

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

वणी : वर्धा नदीला 1 महिन्यात तब्बल 2 वेळा पूर परिस्थिती निर्माण होऊन, अनेक गावांचा संपर्क तुटला होता. परत दुसऱ्यांदा मागील 8 ऑगस्ट पासून 12 ऑगस्ट पर्यंत पुन्हा अनेक गावांचा संपर्क तुटला होता. पूर कमी झाल्यानंतर गावांचा वणी शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर या महापुराचा गाळ साचून असल्यामुळे रहदारी करणे शक्य नाही. अशी ओरड पूर पीडित गावातील नागरिकांची असून मागणी सुद्धा माध्यमातून केली जात आहे.
साधी मोटर सायकल किंवा ऑटो या रस्त्याने चालवणे अवघड झाले असून चिखलामुळे जाणे येणं शक्य नाही. अशावेळी एखादी व्यक्ती आजारी पडल्यास त्यास दवाखान्यात कसे न्यायाचे असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. मात्र, या कडे खासदार-आमदार इतर लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी व संबंधित कार्यालये दुर्लक्ष करीत असल्याचे तक्रारी समोर येत आहे.
या संदर्भात पहिल्यापुरा पासून संबंधिताकडे मागणी करून सुद्धा लक्ष दिले गेले नाही. आता तरी, या प्रश्नाकडे लक्ष घालून संबंधित बांधकाम विभागाने रस्त्यावरील गाळ साफ करून रस्ता रहदारीस खुला करावा व गावाचे पुनर्वसन करावे अशी मागणी शेलू येथील आप्पाजी काकडे, आनंदराव शेटे, देवराव जोगी, दिलीप राजूरकर, मनोज बेलेकर, अशोक कोंडेकर, सचिन निखाडे व इतर गावकरी करीत आहे.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();