घुग्गुस येथे स्थलांतरण न करता डि.ए.व्ही. पब्लिक शाळा भालर वसाहत येथे स्थलांतर करा - विद्यार्थी व पालकांची मागणी


सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : तालुक्यातील निलजई वेकोली (WCL) वसाहत (सुंदरनगर) येथे शैक्षणिक दृष्ट्या चांगल्या दर्जाची शाळा म्हणुन डि.ए.व्हि.पब्लीक स्कुल हि देशातील उत्कृष्ट शाळापैकी एक शाळा आहे. प्रधानमंत्री विकास प्रकल्प अंतर्गत व जागतिक बँक यांच्या अनुदानातून प्रकल्प ग्रस्त शेतकरी व वेकोली (WCL) कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी ही शाळा सुरू करण्यात आली. त्यावेळी डि.ए.व्ही.व्यवस्थापन व वेकोली यांच्या मध्ये करार झाला होता.
पण मात्र, ह्या शाळेचे स्थलांतरण करण्यात येत असल्याने पालक व विद्यार्थी स्थलांतराच्या तीव्र विरोधात आहे. 
डि.ए.व्ही. (DAV) ही शाळा आज पर्यंत सुरू होती पण कोळसा खाणीत सुरू असलेल्या ब्लास्टिंग व डंपिंगमुळे  शाळा जीर्ण अवस्थेत आली आहे. त्या मुळे वेकोली (WCL)  प्रशासनाने सदरहू शाळा स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला असून ही शाळा घुग्गुस येथे स्थलांतरित होत आहे. त्यामुळे पालकांनी व विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करित ही शाळा वणी तालुक्यातच असावी अशी आग्रही मागणी आहे. वारंवार या संदर्भात मागणी करण्यात येत आहे, मात्र मागणीकडे दुर्लक्ष तर होत नाही ना, येत्या २४ ऑगस्ट रोजी सकाळी वणी शहरातील मुख्य मार्गावरून मुकमोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे,अशी माहिती पालक संघर्ष समितीच्या वतीने आज दिनांक २२ ऑगस्ट रोजी स्थानिक वसंत जिनिंग हॉल येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली.
येथील शाळे मुळे मुलांसाठी एक चांगली संधी डि.ए.व्ही. (DAV) शाळेच्या माध्यमातून मिळत आहे,ती सुद्धा हिसकावून घेतली जात आहे. त्या मुळे वेकोली कर्मचारी पेटुन उठला आहे. "जो पर्यंत ही शाळा भालर वसाहत येथे स्थलांतरित होत नाही तोपर्यंत स्वस्त बसणार नाही". असे मत त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. यावेळी  डॉ.सचिन दुमोरे, अनुज मुकेवार, संतोष ढुमणे, अरुण अंभोरे, राजू डवरे, विकेश पानघाटे, महेश पहापळे, रवि गजभिये या सह अनेक पालक वर्ग उपस्थित होते.