टॉप बातम्या

पाथ्रड देवी ग्रामपंचायत तर्फे तिरंगा झेंडे वाटप


चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : तालुक्यातील ग्रामपंचायत पाथ्रड देवी तर्फ तिरंगा झेंडे वाटप करण्यात आले दि. 12 ऑगस्ट रोजी पार पडला. गावामध्ये प्रत्येक घरी जाऊन तिरंगा झेंडे वाटप करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने देशभरात अमृत महोत्सव साजरा होत आहे. तसेच प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी देखील देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियान राबविण्यात यावे, असे आदेश दिले आहेत. यालाच अनुसरून दारव्हा तालुक्यातील पाथ्रड देवी ग्रामपंचायत वतीने 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात आले. भारत देश जगात प्रथम क्रमांकावर मार्गक्रमण करीत आहे. हा अमृत काळ आपण सर्व अनुभवत आहोत.

आज जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम ठेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी. यावेळी स्वातंत्र्याचा महोत्सव साजरा करण्याकरिता सर्व गावकऱ्यांनी झेंडा वंदन करून सहभाग घेऊन नागरिक आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावणार आहेत गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();