टॉप बातम्या

कोब्रा मॅन संतोष वानखेडे यांच्या वाढदिवशी फळझाडे वाटप

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील सगणापूर येथील सर्पमित्र तथा निसर्गप्रेमी कोब्रा मॅन संतोष वानखेडे यांनी आपला जन्मदिवस गावातील नागरिकांना फळझाडे वाटप करून साजरा केला आहे. त्यांच्या ह्या कृतीचे कौतुक होत असून पर्यावरण पोषक उपक्रम करून संतोष वानखेडे यांनीजन्मदिवस साजरा करून एक आदर्श समाजापुढे ठेवला. कोब्रा मॅन संतोष वानखेडे हे उच्चशिक्षित असून त्यांना सापाबद्दल विशेष आकर्षण असून आजपर्यंत वानखेडे यांनी 988 सापांना जीवदान दिले. त्यांच्या उपक्रमाने समाजात पर्यावरण रक्षणाचा संदेश जात आहे. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();