टॉप बातम्या

बोरी (खु) येथे उत्सहात पोळा सण साजरा

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील बोरी खु येथे मोठ्या उत्सहात व शांततेत पोळा सण साजरा करण्यात आला.
या छोट्याश्या गावात पाच ते सहा बैलाची जोडी त्यांना सजवून गावाच्या मुख्य रस्त्यावर बैल पोळा भरवण्यात आला होता, यावेळी ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते अंकुश माफूर यांच्या उपस्थितीत हा पोळा सण पार पडला.


पोळा या सणानिमित्ताने गावातील महिला, पुरुष, युवक, युवती, बाल, वृद्ध सर्व उपस्थित होते. यावेळी सर्वांनी मोठ्या आनंदाने "एक मन गर्वरा पार्वती हर बोला हर हर महादेव" असा जयजयकार करित उत्सहाची प्रथम जोडीला मान देत

सांगता करण्यात आली. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अंकुश माफूर यांनी तमाम मारेगाव तालुक्यातील जनतेला पोळा व तान्हा पोळाच्या शुभेच्छा दिल्या. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();