कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
चंद्रपूर : इयत्ता 10 वी मध्ये 80 टक्केच्या वर, इयत्ता 12 वी मध्ये 70 टक्के च्या वर व पदवी 70 टक्केच्या वर गुण प्राप्त करणाऱ्या 'गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रविवार दि.10 जुलै रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके चे सभागृह, नागपूर रोड चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या सत्कार सोहळ्या चे अध्यक्ष मा श्री दशरथ मडावी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा क्रांती दल, महाराष्ट्र राज्य हे आहेत. तर उदघाटक म्हणून मा श्री राजेश राजगडकर उपमुख्य अभियंता, सीटीपी एस चंद्रपूर, हे असणार आहे.
कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक श्री रोहन घुगे (मा प्र से) सहा. जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी चंद्रपूर, श्री प्रशांत खाडे विभागीय वन अधिकारी, श्री सुभाष कुमरे नियोजन अधिकारी, श्री रोशन इरपाते पोलीस उप निरीक्षक राम नगर पो. स्टेशन, चंद्रपूर हे आहेत.
या कार्यक्रमाची विशेष अतिथी म्हणून श्री धर्मराव पेंदाम, प्रा डॉ श्रीकांत मसराम, प्रा डॉ निलेश मंगाम, प्रा डॉ भूषण नैताम हे असणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व दहावी बारावी व पदवी च्या विद्यार्थ्यांना या सत्कार सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन बिरसा क्रांती दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
चंद्रपूर : बिरसा क्रांती दलाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 07, 2022
Rating:
