लोकमान्य टिळक महाविद्यालयात पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

वणी : येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, द्वारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित व लोकमान्य टिळक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा (ता. 7 जुलै) रोजी आयोजन करण्यात आले होते.
या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रमेश बोहरा यांच्यासह खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार , जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, डॉ.शरद जावळे, संजय देरकर, विद्याताई शितोळे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव लक्ष्मण भेदी, सहसचिव अशोक सोनटक्के, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रसाद खानझोडे तथा विविध बारा संस्थांचे रोजगार अधिकारी उपस्थित होते.
रोजगार मेळाव्यामधून प्राप्त होणाऱ्या नोकरीत मेहनत व जिद्दीने ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करावे. आपले मोठे ध्येय गाठण्यासाठी या छोट्या संधीचे रूपांतर मोठ्या संधीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रोजगार मेळाव्यातील उमेदवारांना केले.
यावेळी पुणे,औरंगाबाद इत्यादी स्थानावरून आलेल्या विविध संस्थांनी सुमारे साडेचारशेच्या वर विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या, यात 116 उमेदवारांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित अणे यांनी तर आभार प्रदर्शन सुनील पावडे यांनी केले.
        जाहिरात साठी संपर्क करा : 9011152179
लोकमान्य टिळक महाविद्यालयात पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न लोकमान्य टिळक महाविद्यालयात पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on July 08, 2022 Rating: 5
Powered by Blogger.