योगेश मडावी | सह्याद्री चौफेर
झरी : तालुक्यातील मुकूटबन येथे अनेक युवक बेरोजगार आहे. सध्या मुकूटबन येथील आरसीसीपीएल (rccpl) कंपनीचे उत्पादन सुध्दा सुरू झाले आहे. परंतु स्थानिकांना डावलून परप्रांतीयांचा भरणा सुरू असून स्थानिक युवकांत कंपनी विरुध्द रोष निर्माण झाला आहे.
त्यामुळे मुकूटबन येथील युवकांनी रोजगार मिळण्यासाठी आरसीसीपीएल (RCCPL) कंपनीला व ग्रापंचायत कार्यालय मुकूटबन येथे निवेदन देऊन उपोषणाचा इशारा देण्यात आला.
चार वर्षापासून आरसीसीपीएल कंपनीचे युद्ध स्तरावर काम झाले असून उत्पादन सुध्दा सुरू आहे. चार वर्षापासून स्थानीक पुत्रांना आश्वासन देऊन थापा मारीत कंपनीत कामावर घेण्यापासून वंचित ठेवल्या जात आहे. सिमेंट कंपनीत काम करण्यासाठी हवे तेवढे शिक्षण युवकाकडे आहे परंतु स्थानिकांना कामावर घेण्यास कंपनी डावलत आहे. या कंपनीत आता उत्पादन सुरू झाले असून कंपनी द्वारे कामगार व कर्मचारी भरती प्रक्रियेत कुशल, अकुशल कामाकरीता स्थानिक बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दयावा.
परराज्यातील कामगारांना रोजगार न देता, स्थानिकांना प्राधान्याने संधी देऊन रोजगार देण्यात यावा या मागणीसाठी तोसीफ उमर शेख, नरेश दारसावार, वसीम हाफिज शेख, सत्यपाल कामतवार, सैफान रऊफ शेख, बबलू अन्सार सैय्यद व इतर कार्यकर्त्यांकडून निवेदन देण्यात आले असून कंपनीने दखल घेतली नाही तर आमरण उपोषण करू व हे उपोषण सतत सुरू राहील असा इशारा देण्यात आला.
आरसीसीपीएल (RCCPL) कंपनीत स्थानिकांना रोजगार द्या!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 07, 2022
Rating:
