चंदू राऊत | सह्याद्री चौफेर
वणी : संततधार पावसामुळे हाहाकार झाला आहे. वर्धा अप्पर डॅम, बेंबळा प्रकल्प मधील मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग पुढच्या दृष्टीने करण्यात आल्याने वर्धा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली. नदीलगत च्या गावाला पुराचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.
परिसरातील गावागावात पाणी शिरले. कोना, झोला, रांगना, भुरकी, सेलू, सावंगी, शिवणी, मुंगोली, उकणी ह्या गावासह जवळपास 15 गावात पुराचे पाणी घरात शिरले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.तसेच जीवनावश्यक वस्तूची राखरांगोळी झाली. घरात पाणी शिरल्याने घरातून बेघर होण्याची वेळ त्यांच्यावर ओढवली, जिवाच्या आकांताने मिळेल हाती लागेल त्या वस्तू घेऊन कोना या गावातील नागरिकांना सावर्ला या गावातील एक शाळेत प्रशासनाच्या वतीने हलविण्यात आले.
कोना गावाला पुराचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला असता, तेथील नागरिकांना सावर्ला गावात हलविण्यात आले. अशी माहिती संजय देरकर व किरणताई देरकर यांना करळताच त्यांनी सावर्ला येथे धाव घेतली व पूर पिडित ग्रस्तांची विचारपूस करून पाचशे लोकांच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था तात्काळ केली यावेळी स्वतः आपल्या हातानी सर्वाना जेवण वाढण्याची जबाबदारी पार पाडली. दरम्यान उखणी, मुंगोली गावात येथील पूरग्रस्त नागरिकांसाठी डॉ.विलास बोबडे, लोकेश बोबडे, सरपंच विठ्ठल बोडे यांच्या मदतीने आरोग्य तपासणी आणि औषध वाटप कॅम्प राबविण्यात आले.
अशा संकटाच्या वेळी प्रशासकीय यंत्रणा पोहचायला उशीर होत असताना देरकर कुटूंबीय धावून आल्याने पूर पीडित ग्रस्ताना मोठी मदत मिळाली. यावेळी संजय देरकर, संजय देठे, विलास कालेकर, लोकेश बोबडे, विठ्ठल बोन्डे, डॉ विलास बोबडे (नायगाव), भगवान मोहिते, प्रवीण खानझोडे, नागेश किनाके, किरणताई देरकर, वृषालीताई खानझोडे, सुरेखाताई ढेंगळे, मीनाक्षी मोहिते, शारदा ताई चिंतकुटलवार, कु.कविता सोयाम आदी सहकारी उपस्थित होते.